कळंब(महेश फाटक ) – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा कळंबच्या वतीने माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी तथा अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक जि.प धाराशिव दत्तात्रय लांडगे यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेतून त्यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांची जि. प. धाराशिव माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली व त्यांनी पदभार स्वीकारला आहे .तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी या पदाचा पदभार ही त्यांच्याकडे दिला आहे. प्राप्त परिस्थितीची जाणीव ठेवून स्पर्धा परीक्षेत अभ्यासात सातत्य ठेवून जिद्द, चिकाटीने, परिश्रमातून, कष्टातून यश संपादन केले त्यांनी पूज्य साने गुरुजींचे विचाराने शैक्षणिक गुणवत्ता वाढवून डीएड कॉलेजचे प्राचार्य ते धाराशिव जिल्हा उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग या पदापर्यंत यशस्वी कार्यकीर्द करणारी अधिकारी हे कळंबचे वैभव आहे म्हणून अखिल भारतीय साने गुरुजी कथामला शाखा कळंब च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी साने गुरुजी कथामला जिल्हाध्यक्ष डी.के. कुलकर्णी, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सुरेश टेकाळे, अखिल भारतीय साने गुरुजी कथामला शाखा कळंब तालुका अध्यक्ष सोपान पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रशांत जोशी, श्यामसुंदर पाटील प्रमोद पोते आदींची उपस्थिती होती.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश