धाराशिव ( जिमाका) – कळंब, भूम व परांडा या तालुक्याच्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेची संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहे योजना ही 15 जून 2021च्या शासन निर्णयाने मंजूर करण्यात आली आहे.ही वसतिगृहे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून सुरू करण्यासाठी खाजगी इमारती भाडे तत्वावर घेवून वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने कळंब,भूम व परांडा या तालुक्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमता असलेल्या या वसतिगृहाकरिता सर्व सोयीयुक्त इमारती भाडयाने घेण्यात येणार आहेत.इमारत धारकाने आपल्या इमारतीमध्ये उपलब्ध सोयी सुविधा,मालकी हक्काबाबतचे कागदपत्रे व इमारतीचे फोटोसह आपले अर्ज सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण धाराशिव यांचेकडे 7 दिवसाच्या आत सादर करावेत.विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी दिली.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक