कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारावीच्या विद्यार्थ्यांचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा – फेब्रुवारी /मार्च -२०२४ मध्ये पुढीलप्रमाणे निकाल लागला आहे. कला शाखेचा एकुण निकाल ८०.८०% त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. चौरे वर्षा भगवान ८४.१७%,द्वितीय क्रमांक कु. अभंगे समृध्दी मोरेश्वर- ८१.००% तृतीय क्रमांक चि. जमाले ऋषीकेश तुकाराम – ७८.८३% विज्ञान शाखेचा एकुण निकाल ९२.८८ प्रथम क्रमांक कु. कुलकर्णी समृद्धी संतोष – ८८.१७%,द्वितीय क्रमांक कु. आडसुळ दिक्षा दत्तात्रय -७९.५०% तृतीय क्रमांक कु. सावंत पल्लवी विलास- ७५.५०% तर वाणिज्य शाखेचा एकूण निकाल -८३.३३ % लागला असून त्यामध्ये प्रथम क्रमांक चि. पाचांळ कृष्णा यशवंत – ७९.०० %,द्वितीय क्रमांक चि.तांबोळी अयान रफिक – ७८.३३ %,तृतीय क्रमांक, चि. कुलकर्णी पार्थ प्रशांत – ७५.५०% एम.सी.व्ही.सी. विभागाचा एकूण निकाल -६७.२७ % लागला असून त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.माने स्नेहा नारायण – ६८.५०%, द्वितीय क्रमांक,पठाण दिशान अकबर- ६४.६७%,तृतीय क्रमांक धोंगडे सुजित सूर्यकांत – ६०.००% या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर,उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, प्राचार्य डॉ. सुनील पवार ,उपप्राचार्य पंडित पवार ,पर्यवेक्षक टेकाळे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.
More Stories
भीमनगरात माता रमाई जयंती उत्साहात;निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण व शहरातून भव्य मिरवणूक
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार