August 9, 2025

मेसाई देवी यात्रेत भाविकांची अलोट गर्दी

  • कळंब (जयनारायण दरक) – कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील ग्रामदैवत मेसाई देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.बुधवार दिनांक एक मे पासून सुरू होणारी ही यात्रा दोन दिवस चालते या दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत धार्मिक कार्यक्रमामुळे प्रचंड गर्दी झाली होती. यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक 2 मे रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत तेजू बारामतीकर यांचा लावणिसह हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावर नृत्य सादर करून दिलखेच अदाकारीने तेजू बारामतीकरसह यांच्या इतर कलाकाराने बहाद्दर नेत्याने प्रेक्षक घायाळ झाले होते.तेजू बारामतीकर सह यांच्या इतर कलाकाराने बहारदार ठसकेबाज लावण्यानी व इतर रिमिक्स गाण्यावर प्रेक्षकांना घायाळ केले तसेच इतर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी समस्त बाभळगाव ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.आई राधा उदो उदो च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.यात्रेत लहान मुलांसाठी खेळण्याची दुकाने नारळ विकणारे यांची दुकाने लावण्यात आली होती.
error: Content is protected !!