धाराशिव – उस्मानाबाद लोकसभेमधून पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर हे खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे मतदारांनी त्यांना भरघोस असे मतदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी लोणी येथील प्रचार सभेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,माजी आमदार राहुल मोटे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, परंडा शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील, काँग्रेसचे तालुकाप्रमुख वाघमोडे,रणजित मोटे यांच्यासह अनेक महविकास पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सर्व सहकारी चारशे पार जाणार अशा घोषणा देत असले तरी देखील ते आतून घाबरलेले आहेत आणि देशात पुन्हा इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.त्यामुळे आपला खासदार हा देखील त्याच विचाराचा असावा म्हणून ओमराजे निंबाळकर यांना भरघोस मतांनी आपण विजयी केलं तर निश्चितपणाने आपला खासदार हा सत्ताधारी होणार आहे. आज विविध सर्वे देखील इंडिया आघाडीच्या बाजूने येत आहेत तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागेवर विजयी होईल असे देखील यावेळी डॉ.पाटील यांनी सांगितले. या प्रचार सभेस लोणी व परिसरातील अनेक मतदार बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक