भोसा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य केवळ दलिता पुरते मर्यादित नव्हते तर शोषणमुक्त समाज निर्मिती हा त्यांचा ध्यास होता.राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी सर्वच देशवासीयांना मूलभूत हक्क, समान संधी,सामाजिक न्याय मिळावा यासाठी तरतुदी केल्या आहेत त्यामुळे डॉ.आंबेडकरांचा खरा विचार समाजापर्यंत पोहोचवणे काळाची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. जगदीश गवळी यांनी व्यक्त केले कळंब तालुक्यातील भोसा येथे आयोजित “समतेचे युवा पर्व भीम जन्मोत्सव” 2024 आयोजित कार्यक्रमात भिमराय समजून घेताना या विषयावर ते बोलत होते भीम जयंती अध्यक्ष हिम्मत कांबळे व भीम जयंती उपाध्यक्ष करण सोनवणे हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) रमेश देशमुख हे होते. यावेळी दत्तात्रय गिरे,वाहेद पटेल, जाकीर पटेल, मंजूर पटेल,आरशाद पटेल,आझाद शेख,आयुब शेख,राकेश ताकपिरे, अहेमद पटेल,उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा.गवळी म्हणाले की,शिवराय फुले शाहू आंबेडकर हे एक मानवतावादी विचाराची साखळी आहे.मात्र अनुयायांनी महापुरुषांना जातीच्या चौकटीत अडकविल्यामुळे पराभव होत आहे. त्यांच्या विचाराचा खरा वसा आणि वारसा नव्या पिढीने चालविणे गरजेचे आहे.यावेळी वाद विवाद,वक्तृत्व,निबंध, रांगोळी,संगीत खुर्ची,लिंबू चमचा. अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ.समाधान चंदनशिवे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा चंदनशिवे यांनी केले. वक्त्याचा परिचय मिलिंद ताकपिरे यांनी केला तर कार्यक्रमाचे आभार सुभाष ताकपिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित ताकपिरे,अविनाश कांबळे,मिलिंद ताकपिरे,संतोष वरटे,अर्जुन सोनवणे,अशोक ताकपिरे,नाना भालेराव,मलिकेश ताकपिरे,बळीराम ताकपिरे, प्रकाश कांबळे,महादेव ताकपिरे, सुनील ताकपिरे,माणिक ताकपिरे, संजय ताकपिरे,व तात्या ताकपिरे व सर्व गावकरी मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात