August 9, 2025

पिंपळगावच्या भवानी देवीची यात्रा उत्साहात संपन्न

  • पिंपळगाव (डोळा) (राजेंद्र बारगुले ) – कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथे भवानी आई (अंबाबाई) देवीची यात्रा आष्टमीला दिनांक १ मे २०२४ रोजी मोठया उत्साहात संपन्न झाली.
    दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात इथे यात्रा भरत असते. १२ बैलगाडया ओढल्यानंतर पालखीची मिरवणूक निघते.
    बारा बैलगाड्या ओढण्याचा मान रावण कांबळे यांच्यानंतर बापूराव कांबळे यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने चालत आला आहे.
    काही वर्षे टेकाळे यांनी बैलगाड्या ओढल्या होत्या.
    यंदा बंटी टेकाळे यांनी बापू कांबळे यांना सहकार्य केले.
    परिसरातील भाटशिरपुरा, मंगरूळ,डिकसळ,करंजकल्ला या गावातून यात्रेसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला.
error: Content is protected !!