उदगीर – काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष आ.बाबासाहेब पाटील व आ.विक्रमजी काळे यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे व प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी उदगीर येथील राकाँपा सामाजिक न्याय विभगाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.त्याना नियुक्ती पत्र दि.३ ऑक्टोंबर २०२३ रोजी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी राकाँपाचे प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे व ठाण्याचे माजी खा.आनंद परांजपे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे व प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी