कळंब – भारत जोडो अभियानच्या धाराशिव जिल्हास्तरीय चर्चात्मक मेळाव्याचे आयोजन दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी वार बुधवार या दिवशी सकाळी ११.०० ते सायंकाळी ०४.०० पर्यंत शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे करण्यात आले आहे. या चर्चात्मक मेळाव्यात धाराशिव जिल्ह्यातील अतिक्रमिणीत गायरान जमिनी,महिला सबलीकरण,पारंपारिक कलावंताच्या समस्या, निराधार,भूमिहीन शेतमजूर,ऊसतोड कामगार,बांधकाम,सफाई कामगार,औद्योगिकरण, ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती,आरोग्य,शिक्षण, रोजगार,महागाई, खाजगीकरण आणि संविधानातील मूलभूत अधिकार आदी विषयावर भारत जोडो अभियानाची भूमिका आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्वराज इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष ललित बाबर,महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ तोडकर,भटक्या विमुक्त जातींचे नेते प्रा.सुधीर अनवले,भारत जोडो अभियानचे नेते प्रा.अर्जुन जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या मेळाव्यासाठी संविधान आणि लोकशाही प्रेमी सामाजिक संस्था व बिगर राजकीय संघटनाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे विनम्र आवाहन स्वराज्य इंडियाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी