शिराढोण (परमेश्वर खडबडे ) – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कळंब तालुक्यातील हिंगणगाव येथे दि.२१ एप्रिल २०२४ रोजी जयंती कमीटीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका विद्या बनसोडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सुत्रसंचालन संजय लोढे यांनी केले. तसेच गावातील लहान मुले व मुली यांनी आपली कला सादर करुन बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महामानवास अभिवादन केले. लहान मुला मुलींनी आपली कला सादर केल्या बद्दल कमीटी उपध्यक्ष अनिल लोढे दोन हजार रुपये व कमीटी सचिव विकास आवाड यांनी एक हजार रुपये बक्षीस घोषित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगणगाव सरपंच सुरेखा लोढे व उपसरपंच आशा हातमोडे यांच्या हस्ते झाले. यासाठी कमीटीचे अध्यक्ष बाळासाहेब आवाड, उपाध्यक्ष अनिल लोढे,सचिव विकास आवाड, व खजिनदार धनराज आवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम शांतपणे पार पडला .
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”