August 8, 2025

हिंगणगावात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  • शिराढोण  (परमेश्वर खडबडे ) – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त कळंब तालुक्यातील हिंगणगाव येथे दि.२१ एप्रिल २०२४ रोजी
    जयंती कमीटीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
    याप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका विद्या बनसोडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सुत्रसंचालन संजय लोढे यांनी केले.
    तसेच गावातील लहान मुले व मुली यांनी आपली कला सादर करुन बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने महामानवास अभिवादन केले. लहान मुला मुलींनी आपली कला सादर केल्या बद्दल कमीटी उपध्यक्ष अनिल लोढे दोन हजार रुपये व कमीटी सचिव विकास आवाड यांनी एक हजार रुपये बक्षीस घोषित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगणगाव सरपंच सुरेखा लोढे व उपसरपंच आशा हातमोडे यांच्या हस्ते झाले.
    यासाठी कमीटीचे अध्यक्ष बाळासाहेब आवाड, उपाध्यक्ष अनिल लोढे,सचिव विकास आवाड, व खजिनदार धनराज आवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम शांतपणे पार पडला .
error: Content is protected !!