वसमत – महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ.भीमराव आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त जि.प.प्रा.शाळा कन्हेरगाव येथे सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांना सावली प्रतिष्ठाण कन्हेरगाव ता.वसमत जि.हिंगोली चे अध्यक्ष कमल पांडुरंग पवार सचिव दिनाजी बुजवणे यांनी आयोजन केले होते.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बि.एम.इदोरे यानी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषवले होते तर प्रमुख उपस्थितीत सरपंच प्रतिनिधि गोविंद सूर्यवंशी, उपसरपंच विजय जगताप, पोलीस पाटील सोमनाथ बेले, माधव जगताप,माजी तंटामुक्त अध्यक्ष चादोजी जगताप, सुभाष पाचकोरे, माजी शा.स .अध्यक्ष राघोजी गजभार,गणेश गजभार, रविंद्र वाघमारे, अजय गजभार, जगदीश कोल्हे,संदिप हेरे,मुंजाजी साबणे,कोडिबा मोरे, बाबाराव जगताप,आनंद आवटे,लक्ष्मण गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.शाळेतील एकूण 60 मुली मुलांना साहित्य वाटप करून महामानवास अभिवादन करण्यात आले. सर्व जातीधर्मातील मुली मुलांना संविधानातील मुलभूत अधिकारा बाबत तरतुदीनुसार सर्व जातीधर्मातील लोकांना न्याय मिळवून देणारे व्यक्तिमत्व दोन्हीपण महापुरुषांनी केले आहे असे मत मुख्याध्यापक इदोरे यानी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती शितल द्यानोबा पवार, पुढाकार घेऊन समारोप श्रीमती रिना शरदराव खिंडरे यांनी समारोप करण्यात आला. विनोद गजभार यांनी परिश्रम घेतले.
More Stories
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
जनकल्याण अर्बन को-ऑप बँक २०२४ वर्षी बँको ब्लू रिबन पुरस्काराने सन्मानित