पिंपळगाव (डोळा) – कळंब तालुक्यातील पिंपळगाव(डोळा) येथील अंगणवाडीत दि.१४ एप्रिल २०२४ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सा.साक्षी पावणज्योतचे विशेष प्रतिनिधी राजेंद्र (भाऊ) बारगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी शिक्षिका पल्लवी घोडके व गावातील तरुणवर्गांतील नागरिकांची उपस्थिती होती. यामध्ये सागर घोडके,संकेत दत्त,सुदर्शन टेकाळे, श्रीकृष्ण टेकाळे,अक्षय टेकाळे, बबन इंगोले,श्रीकांत टेकाळे आदींची उपस्थिती होती.
More Stories
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान