August 9, 2025

14 एप्रिल रोजी मद्य विक्री दुकाने बंद

  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.हा उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिने, सार्वजनिक शांतता अबाधीत राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी, विदेशी, एफएल-2, सीएल-3, एफएलबीआर-2, परवानाकक्ष अनुज्ञप्त्या, एफएल-4 मद्य व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
error: Content is protected !!