धाराशिव – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीचे आयोजीत कार्यक्रम काल पासुन चालु झाले आहेत.बुध्द गुफा देखावा उभारुन महामानवाला एका अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचा प्रयत्न केला आहे.हा बुध्द गुफा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी असुन दि.१२ एप्रिल २०२४ रोजी यशराज पब्लिक स्कुल धाराशिव शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली तर समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात नेत्र,बिपी तपासणीसाठी लहान मुलांपासुन ते वयोवृद्ध व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.शिबिराचे उद्घाटन सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेत्या डॉ.स्मिताताई शहापुरकर यांच्या हस्ते तर यशराज पब्लिक स्कुल धाराशिवच्या संचालिका रेखाताई जेवळीकर,कुसुम वाघमारे,साधना वाघमारे,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,दलित मित्र शंकर खुने,युवा समुह मंचचे युसुफ सय्यद,रऊफ शेख,देवानंद एडके,रुधिर गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले.आरोग्य शिबिरातील वैद्यकीय अधिकारी डॉ.कुरील,डॉ.पडवळ,डॉ.विक्रांत राठोड,स्टाफ नर्स प्रियदर्शनी सरवदे,टिळे व इतर मान्यवरांचे समितीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.मान्यवरामध्ये माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,राणा बनसोडे,पृथ्वीराज चिलवंत,धनंजय राऊत,दिपक गंभीरे, सुबोध बनसोडे,अशोक सावंत उपस्थितीत होते,समितीचे पदाधिकारी गणेश रानबा वाघमारे,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे,संजय गजधने,बलभीम कांबळे,प्रविण जगताप,संपतराव शिंदे,बापु कुचेकर,दिपक गंभीरे, महेश लोंढे,विष्णु घरबुडवे,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,अनोखी वाघमारे,संबोधी गायकवाड अन्य इतर उपस्थितीत होते,यशराज पब्लिक स्कुल धाराशिव शाळेची सहल बुध्द गुफा देखावा पाहण्यासाठी आली असता समितीच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक वर्ग यांचे स्वागत करुन कार्यक्रमाची माहिती गणेश रानबा वाघमारे यांनी दिली,सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी शिबिराचा लाभ घेतला.समितीच्या वतीने फळे वाटप करण्यात आली.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी