कळंब -शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनसिंह ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी मानले.यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर