August 9, 2025

कळंब आगारातील नादुरुस्त बसमुळे प्रवासी त्रस्त

  • कळंब (महेश फाटक) – कळंब आगारातील नादुरुस्त बसमुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना ताटकळत बसण्याची वेळ आल्यामुळे प्रवाशांच्या संतापला सामोरे जाण्याचा प्रसंग चालक आणि वाहक यांच्यावर आला. आगारातील बस संख्याबळ हे ८८ ते ९० असताना यातील काही बस वर्कशॉप मध्ये असतात,वरिष्ठ अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप येथील कार्यरत वाहक मनोहर मुळीक यांनी केला.
    यावेळी सा.साक्षी पावनज्योतला सांगताना मुळीक म्हणाले की, नऊला सुटणारी बस नादुरुस्त कारणाने एक तास उशिरा निघते व अधिकारी यांना विचारणा केल्यावर ते आम्हालाच उद्धट पणाने बोलतात व मी अशी तक्रार लेखी स्वरूपात मुळीक यांनी दिली आहे.सध्याचा एप्रिल महिना सन जयंती उत्सवाचा आहे आणि परीक्षेचा कार्यकाळ असल्याकारणाने ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना एसटीच्या भोंगळ कारभारामुळे वेळेत पोहोचता येत नाही. वेळप्रसंगी एसटी बसच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवासी विद्यार्थ्यांचा स्टँडिंगने प्रवास करताना दिसून आले.या अगोदर एसटी बसच्या अशा कारभारामुळे बरेचदा बातम्या देण्यात आल्या आहेत परंतु आगारातील अधिकाऱ्यांना याचा काही फरक पडताना दिसत नाही.याचा परिणाम प्रवाशांना व विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे.

error: Content is protected !!