धाराशिव – मतदारसंघात जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी लढत होत आहे. धनशक्तीला जनतेच्या बळावर रोखण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर मैदानात आहे, ही निवडणुक सामान्य जनतेच्या अतुट साथीमुळे आता जनतेचीच झाली आहे. त्याचे बोलकं उदाहरण दि.७ एप्रिल २०२४ रोजी ओम दादांना अनुभवयला मिळाले. शिवराज नानाभाऊ नांगरे नावाच्या सामान्य शेतकरी बांधवाने निवडणूकिसाठी चक्क दहा हजार रुपयाचा धनादेशच दिला आहे. ही फक्त दहा हजाराची रक्कम नसुन या लढाईसाठी मला दहा हत्तीचे बळ देणारी बाब आहे. निवडणुकीच्या काळात हे उदाहरण सकारात्मक आहे. ओम राजेंसाठी तर हा अत्यंत भावनिक करणारा क्षण आहे. शेतकरी बांधवाने केलेली मदत ही देशाची लोकशाही वाचविण्यासाठी टाकलेले पाऊल मानले..!
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला