कळंब – वृक्ष आपणास सावली देतात ऑक्सिजन देतात आपणास उन्हाचा कडाका सहन होत नाही म्हणून वृक्षाच्या दाट छायेखाली थांबल्यानंतर मिळणारा विसावा व आराम वेगळाच आनंद देऊन जातो पृथ्वीवरील वृक्षाचे आवरण कमी होत चालले आहे निर्माण होणाऱ्या उष्णताच्या लाटा जीवाची काहिली करीत आहेत या यापासून संरक्षण व्हावे म्हणून वृक्षाच्या सावलीत मिळणारा गारवा अल्हाददायक वाटतो वृक्षारोपण कार्यक्रम शासन व सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणावर राबवित असतात परंतु हे वृक्ष वाढली पाहिजे त्यांचे संरक्षण व संगोपन झाले पाहिजे हे आपण विसरून जातो कळंब शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे परंतु या वृक्षारोपण पाणी वेळेवर मिळत नसल्याने ती सुकून जात आहेत यासाठी कळंब शहरातल्या सामाजसेवी संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व जेष्ठ नागरिकांनी हे वृक्ष वाचवण्यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येकाने आपला वाढदिवस या वृक्षारोपानां पाणी देऊन साजरा करावा असे आवाहन केले आहे यानुसार कळंब येथील प्रसिद्ध विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे यांनी ८० वा वाढदिवस ५ एप्रिल रोजी समाजसेवी उपक्रमांनी साजरा केला व चार टँकर पाण्याची व्यवस्था करून वृक्षारोपण पाणी दिले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते न्यायालया पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षारोपानां पाणी दिले या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली याप्रसंगी उपस्थितांनी विधीज्ञ त्रिंबकराव मनगिरे यांचा शाल ,पुष्पहार देऊन सत्कार केला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी प्रा. संजय कांबळे, महादेव महाराज अडसूळ, पांडुरंग तात्या कुंभार, अतुल गायकवाड प्रा. अरविंद खांडके, विलास करंजकर, विधिज्ञ दिलीपसिंह देशमुख ,विधीज्ञ दिगंबराव गायकवाड ,सुरेश टेकाळे ,माधवसिंग राजपूत ,बंडू ताटे, प्रकाश भडंगे ,महंमद चाऊस ,शशिकांत निरपळ ,शिलानंद शिनगारे ,शहाजहान शिकलगार,उध्दव धस,कलीम तांबोळी, मुकुंद मामा साखरे, हनुमंत जाधव यांनी सहभाग घेतला.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन