August 9, 2025

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सेल्फी पॉइंटचे उद्घाटन

लातूर (दिलीप आदमाने ) – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ४१-लातूर लोकसभा मतदारसंघ (अ.जा.) तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, लातूर यांच्या मार्गदर्शनानुसार २३५-लातूर शहर मतदार संघ स्वीप अंतर्गत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात मतदार जागृती रॅली काढणे, विविध स्पर्धा आयोजन करणे, असंघटित कामगारांचे पथनाट्यद्वारे प्रबोधन करणे, रंग लोकशाहीचा अंतर्गत मतदार जागृती टयटू, टोप्या तयार करणे, मतदार जागृतीसाठी ग्रिटींग बनविणे, चित्रकला स्पर्धा, रागोळी स्पर्धा आणि रंग भरण स्पर्धा, भारत भाग्य विधाता गट स्थापन करणे, स्वाक्षरी मोहीम, दिव्यांग मतदारांना संकल्प पत्र देणे आणि चुनावी पाठशाला अशा दहा कलमी कार्यक्रमांतर्गत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात सेल्फी पॉइंटचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, डॉ. बाळासाहेब गोडबोले, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, डॉ. अभय धाराशिवे आणि एन.सी.सी.कॅडेट्स यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. संजय गवई म्हणाले की, आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये ०७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे तेव्हा मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी सर्वाना प्रोत्साहित करावे असेही ते म्हणाले. यावेळी सर्वानी सेल्फी काढले

error: Content is protected !!