कळंब – सामान्यातील असामान्य आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सा.साक्षी पावनज्योतचे उपसंपादक माधवसिंग राजपूत यांच्या सहवासात आम्हाला सामाजिक काम करण्याची संधी मिळतेय हे आमचे खूप मोठे भाग्य असल्याचे हृदयस्पर्शी उद् गार ह.भ.प. महादेव आडसूळ यांनी पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या हिरकमहोत्सवी निमित्त सत्कारा प्रसंगी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या एकसष्टी निमित्त साक्षी कोचिंग क्लासेसच्या सभागृहात दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ८.०० वाजता ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली हिरक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष सुभाष घोडके, ज्ञानदा संस्थेचे अध्यक्ष बंडू ताटे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भडंगे,पत्रकार परमेश्वर खडबडे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे आदींनी मनोगत पर माधवसिंग यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन व आभार प्रा.अविनाश घोडके यांनी केले. या कार्यक्रमासाठी माधवसिंग राजपूत यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार खूप मोठ्या संख्येने हजर होता.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी