धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.30 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 165 कारवाया करुन 1,23,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)अमोल तुमराज देवकर, वय 35 वर्षे, रा. वडार गल्ली शिवाजी चौक धाराशिव ता. जि. धाराशिव दि.30.03.2024 रोजी 14.30 वा. सु. नगर परिषदचे मोकळे जागेत आठवडी बाजार धाराशिव येथे अंदाजे 8,280 ₹किमतीची 138 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
कळंब पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)रेखा शिवाजी पवार, वय 29 वर्षे, रा. वाकडी के, ता. कळंब जि. धाराशिव या दि.30.03.2024 रोजी 19.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या पाठीमागे वाकडी के येथे अंदाजे 18,600 ₹किमतीची 160 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 50 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)अतुल सुरेश कांबळे, रा. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव दि.30.03.2024 रोजी 17.30 वा. सु. कसगी बॉर्डर जवळ दत्त मंदीराजवळ कसगी येथे अंदाजे 11,000 ₹किमतीची 90 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)बिभीषण उर्फ संतोष गुंडु मस्के, वय 48 वर्षे, रा. भातांगळी ता. लोहारा ह.मु. कोराळ ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.30.03.2024 रोजी 18.30 वा. सु. कोराळ मोड येथील पत्रयाचे शेड समोर अंदाजे 2,800 ₹किमतीची 28 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.30.03.2024 रोजी 13.30 ते 15.20 वा. सु. वाशी पो.ठा हद्दीत 3 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे- 1) सिकंदर अब्दुल शेख, वय 55 वर्षे, रा. चौसाळा ता. जि. बिड, 2) रविंद्र पोपटराव देवकर, वय 49 वर्षे, रा. ब्राम्हण गल्ली वाशी ता. वाशी जि. धाराशिव, 3)अशोक बापुराव शिंदे, वय 26 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव हे तिघे पारगाव येथील मुख्य चौकात कोकणे हॉस्पीटल शेजारी, सरमकुंडी गावातील मुख्य चौकाच्या उजवे बाजूस असलेल्या पत्रयाचे शेड मध्ये, ईट बसस्थानक चौकातील न्यु मिलन दुध डेअरीच्या पाठीमागे असे तीन ठिकाणी कल्याण मटका, मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह(एलईडी स्क्रीन, सीपीयु, रिमोट, किबोर्ड, माउस) एकुण 2,140 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-आनंदराव वामन घायाळ, वय 64 वर्षे, रा. बोरी ता. वाशी जि. धाराशिव यांचे राहाते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 30.03.2024 रेजी 13.30 ते 15.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील लाकडी सोकेश मध्ये ठेवलेले 55 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 11,000₹ असा एकुण 1,55,000 ₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे आनंदराव घायाळ यांनी दि.30.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-श्रीराम उर्फ घनशाम सिताराम मारेकर, वय 41 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांचे माडज शिवारातील शेतातुन व 7 शेळ्या व 03 पिल्ले, गावातील 5 ईलेक्ट्रीक मोटारी असा एकुण 29,000₹ किंमतीचा माल हा दि. 16.01.2024 रोजी ते दि. 23.03.2024 रोजी 04.00 वा. सु. आरोपी नामे- विशाल मोहन गायकवाड, 2) विकास भानुदास काळे, 3) गहिनीनाथ लक्ष्मण सुर्यवंशी सर्व रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे श्रीराम मारेकर यांनी दि.30.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379,506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सुधीर विष्णु घोंगडे, वय 55 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि.धाराशिव यांचे राहाते घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 23.03.2024 रोजी 22.30 ते दि. 24.03.2024 रोजी 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील रोख रक्कम 74, 000₹ चेरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुधीर घोंगडे यांनी दि.30.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 380, 461 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)सुमित संपत जाधव, 2) रोशन भगवान जाधव, 3) भगवान कोंडीगा जाधव, 4) सनद भगवान जाधव सर्व रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.26.03.2024 रोजी 09.00 वा. सु. व दि. 28.03.2024 रोजी 08.00 ते 09.00 वा. सु. रोहकल रस्ता वाल्हा येथे फिर्यादी नामे- रणजित जयराम भोरे, वय 25 वर्षे, रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांना शेतीच्या वादाच्या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टरला मोटरसायकलने धडक देवून फिर्यादी उटत असताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठी, टॉमीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे चुलते अण्णा देवराव भोरे यांनाही लाथाबुकृयांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे रणजित भोरे यांनी दि.30.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 307, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) सुरेश भोरे, 2) नितीन भोरे, 3) आण्णा भोरे, 4) दादा भोरे, 5) रणजित भोरे, 6) बालाजी भोरे, 7)शेषेराव भोरे, 8)मारुती भोर, 9) जयराम भोरे, सर्व रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 28.03.2024 रोजी 08.00 वा. सु. वाल्हा येथील धोंडीबा वस्ती येथे फिर्यादी नामे-भगवान कोंडीबा जाधव, वय 65 वर्षे, रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड, लोखडी, रॉड, लोखंडी पाईपचा खोऱ्याने डोक्यात व हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे मुलगा व पुतण्या हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे भगवान जाधव यांनी दि.30.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 307, 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)छबुबाई महादेव मगर, 2) सुरज तानाजी मगर, 3) प्श्रदिप प्रकाश मगर, 4) नवनाथ भगवान मगर, 5) निलेश महादेव मगर, 6) लक्ष्मी राजेंद्र मगर सर्व रा. खानापूर ता.जि. धाराशिव यांनी दि. 29.03.2024 रोजी 19.30 वा. सु. खानापुर येथे फिर्यादी नामे- रंजित शिवाजी मगर, वय 31 वर्षे, रा. खानापुर ता. जि. धाराशिव यांना व त्यांची आई अनिता शिवाजी मगर यांना केस करण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे रंजित मगर यांनी दि.30.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 143, 147, 149, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. सह कलम 92 अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) लक्ष्मण देवराज चव्हण, 2) प्रताप लक्ष्मण चव्हाण, 3) नितीन लक्ष्मण चव्हाण, 4) बाळकृष्ण लक्ष्मण चव्हाण, 5) सुनिता तानाजी राठोड, 6) सविता चंदु राठोड, 7) पारुबाई दिगंबर चव्हाण, 8) सरुबाई लक्ष्मण चव्हाण, 9) ललिता प्रताप चव्हाण, 10) प्रिंयका बाळकृष्ण चव्हाण सर्व रा. नाईकनगर सुं ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 30.03.2024 रोजी 20.00 वा. सु. नाईकनगर सुं येथे फिर्यादी नामे- सनिता अशोक चव्हाण व त्यांचे पती, सासु नंनद यांना नमुद आरोपींनी शेतातील बांधाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाकडी काठी, दगड, कुह्राडीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुनिता चव्हाण यांनी दि.30.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 427, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)सुरेश भोरे, 2) रणजित भोरे, 3) जयराम भोरे, 4) बालाजी भोरे, 5) शशिकांत भोरे, 6) मंदा भोरे, सर्व रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 26.03.2024 रोजी 08.30 वा. सु. शेतगट नं 323 वाल्हा येथे फिर्यादी नामे- संपत कोंडीबा जाधव, वय 48 वर्षे, रा. वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांना शिवीगाळ का करता असे विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, वेळुची काटी, दगड, कुह्राडीचा लोखंउी दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे संपत जाधव यांनी दि.30.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 326, 324, 323, 504, 506,143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी