कोंड – दिनांक 7 मार्च 2024 रोजी धाराशिव जिल्ह्यातील कोंड या गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन व पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन नबी मुलानी,महावीर दादा जाधव,अनिल सरवदे यांनी केले होते.वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल यांच्या शुभहस्ते वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे प्रभारी अँड.रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष बी.डी .शिंदे, जिल्हा प्रवक्ते प्रा.के.टी.गायकवाड, धाराशिवचे तालुकाध्यक्ष व ढोकीचे प्रभारी राहुल पुरे,कळंब शहराचे नेते अनिल हजारे, भूम तालुक्याचे तालुकाध्यक्ष मुसाफ भाई शेख,त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा नेते रुस्तुम भाई पठाण, कळंब शहराचे प्रभारी शिवाजी कांबळे, येरमाळ्याचे प्रभारी महादेव कांबळे, युवक जिल्हा प्रतिनिधी प्रमुख कृष्णाजी शिनगारे,विकास बनसोडे, शेख कलीम मोमीन,मेराज कादरी तसेच कळंब शहरातील युवा नेते सनी मस्के,धनंजय ताटे या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गावामध्ये शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात महिलांचा देखील सहभाग हा लक्षणीय होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाड्याची उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्यासोबत सर्व मान्यवरांना सोबत घेऊन गावकऱ्यांनी गावामध्ये रॅलीचे आयोजन केले होते.त्यानंतर कार्यक्रमास्थळी आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी कोंडच्या शाखेचे नवनिर्वाचित शाखाध्यक्ष नशीर शेख यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.तसेच गावातील ग्रामपंचायतचे सदस्य बाबासाहेब अनिल चिलवंत यांचा देखील मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते वंचित बहुजन मध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला.त्याचबरोबर ग्रामपंचायतचे माजी सदस्य चितांबर गंगाधर पाटील व निवृत्त पोलीस निवृत्ती अडसुळे यांचा देखील प्रवीण दादा यांच्या हस्ते पक्षात प्रवेश घेण्यात आला. वय 105 वर्ष असलेल्या वंचित बहुजन प्रेमी अशा बावन जाधव यांचा देखील प्रवीण दादा यांच्या हस्ते वंचित बहुजन मध्ये प्रक्ष प्रवेश घेण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी गावामध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी प्रवीण रणबागुल मार्गदर्शन करत असताना म्हणाले की,गावामध्ये कसलेही अडचणींना आता घाबरायचं नाही. लढायचं कसल्याही प्रकारच्या अमिषाला बळी पडायचं नाही. देशात सध्या अस्थिरता भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याच्यामुळे भीतीचे वातावरणामध्ये जगायचं नाही. प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या संकटाला वंचित बहुजन आघाडी सदैव धावून येईल असे देखील प्रवीण रणबागुल यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व पदाधिकारी संजय शिंदे,किरण जाधव, बंकट जाधव, वैजनाथ जमादार, विलास कस्पटे, कल्याण पांचाळ, अमर जाधव, हकीम बाबा शेख, अभिषेक ननवरे ,शिवाजी चित्ते, विकास जमादार, बाबासाहेब चिलवंत, विशाल शिंदे ,सागर जाधव, ज्ञानोबा कांबळे ,बालाजी शिंदे, या सर्व पदाधिकाऱ्यासोबत गावातील दोनशे ग्रामस्थांचा वंचित बहुजन मध्ये प्रवेश झाला.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन