August 9, 2025

स्त्री आदिशक्ती

तलवारीच्या धारेवरती
पराक्रमाचे बोल बोलती
इतिहासातील अमर कहाणी
रणरागिणी झाशीची राणी

स्वप्न पाहिले खुल्या लोचणी
स्वराज्य स्थापन करण्याचे
घडविले जिने वीर शिवबाला
मानाचा मुजरा राजमाता जिजाऊला

हाती घेऊन अक्षरलेखनी
दान दिलेस विद्येचे
नारी तू उद्धारली
ज्ञानज्योती सावित्री

आंबेडकरी लेखणीची धार
दीनदुबळ्यांसाठी झिजली फार
बलिदान,करुणा,प्रेम अपार
रमाईचे थोर उपकार

अनाथांची माय होऊनी
लाखो मुले ओटी घेऊनी
संस्काराचे बीज रोवूनी
माय सिंधू गेली सोडूनी

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
या सृष्टीची तूच जननी
कधी कर्तुत्व कधी गृहिणी
या संसारी तूच स्वामिनी

शत शत नमन तुला मर्दिनी
शत शत नमन तुला मर्दिनी

शब्दरचना-छाया फाटक तौर

error: Content is protected !!