August 9, 2025

मराठवाडा शिक्षक संघटनेच्या मागणीला यश

कळंब (विशाल पवार) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना जाहीर केली.
२००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीच्या काळात डी सी पी एस ही योजना कार्यान्वित होती. २०१६ साली या योजनेचे रूपांतर एन पी एस योजनेमध्ये करण्यात आले परंतु ही पेन्शन योजना देखील कर्मचाऱ्यांच्या हिताची नव्हती या विरोधात अनेक संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली, मोर्चे काढले. अखेर २९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन पेन्शन योजना जाहीर केली.या योजनेअंतर्गत २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शेवटच्या महिन्यातील पगाराच्या ५०% बेसिक व त्यावरील महागाई भत्ता असे निवृत्तीवेतन मिळेल तसेच ६०% कुटुंब निवृत्ती योजनेची तरतूद देखील या नवीन पेन्शन योजनेमध्ये करण्यात आली आहे. २००५ पूर्वी नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रॅच्युइटी तसेच रजा रोखीकरण हे लाभ देखील नवीन पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे हार्दिक आभार व अभिनंदन.सदरील पेन्शन योजना लागू झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. विविध संघटनांच्या यशाचे फलित आज मिळाल्यासारखे सर्व कर्मचाऱ्यांना वाटत आहे. मराठवाडा शिक्षक संघटनेने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चांच्या आयोजन करण्यात आले होते. व जुनी पेन्शन योजनेचे मागणी सातत्याने मांडली होती.
 दि.५ मार्च २०२५ रोजी त्याचाच एक भाग म्हणून विद्याभवन हायस्कूलमध्ये मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्र कार्यकारणी सदस्य सुशील कुमार तीर्थकर व धाराशिव जिल्हा संघटना सचिव विक्रम मायाचारी यांचा सत्कार सर्व नवीन लाभधारक कर्मचारी व प्रशालेचे मुख्याध्यापक पवार विलास, पर्यवेक्षक खामकर दिगंबर यांच्या हस्ते प्रशालेमध्ये करण्यात आला. याप्रसंगी मराठवाडा शिक्षक संघटना केंद्र कार्यकारणी सदस्य सुशील कुमार तीर्थकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की मराठवाडा शिक्षक संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य, शिक्षक भारती शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, या सर्वांच्या संघ एक जुटीचा विजय आहे.असे विचार व्यक्त करून आपले मत मांडले.
याप्रसंगी शिक्षक भारती शिक्षक संघटनेचे कळंब तालुकाध्यक्ष ज्योतीराम सोनके,आनंद रामटेके, सतीश कानगुडे, अशोक राऊत, प्रशांत गुरव,रविकांत कोल्हे, शरद टोम्पे, दत्तात्रय पवार, निशांत जिंदमवार, अकबर शेख, आप्पासाहेब वाघमोडे, चव्हाण सुरेश, संदीप पाटील आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर विनोद यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल पवार यांनी केले.

error: Content is protected !!