August 9, 2025

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • लातूर (दिलीप आदमाने ) – आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, लातूर शहर महानगरपालिका, लातूर आणि राष्ट्रीय सेवा योजना, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ मार्च २०२४ पोलिओ रविवार दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलीओवर विजय दरवेळी अभियानांतर्गत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात खंडोबा गल्ली परिसरातील नागरिकांनी आपल्या पाच वर्षा पर्यन्त आणि त्यावरील बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील ग्रंथालयासमोर याचे नियोजन करण्यात आले होते. स. ७.३० वा. पासून ते सायंकाळी ६.०० वा.पर्यंत या बुधवर पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले दुपारपर्यंत पाच वर्षापर्यंतच्या १२० बालकांना तर पाच वर्षा नंतरच्या ०८ बालकांना असे एकूण १२८ बालकांना लसीकरण करण्यात आले.
    या लसीकरण बुथला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व आरोग्य कर्मचारी, नागरिक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बालकांचे अभिनंदन करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
    या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जी. एन. एम. वैशाली राठोड, साक्षी गायकवाड, सहशिक्षक सुनिता कुलाल, आशा वर्कर केशरबाई मुलगे आणि डी. एन. एम. एम. एल गुरव, रंगनाथ लांडगे आणि गोपाळ तिरमले यांची प्रमुख उपस्थिती होती.
error: Content is protected !!