(हृदयाला पिळवटून टाकणारी- साक्षी कादंबरी) सत्यघटनेवर आधारित साक्षी ही लघु कादंबरी आहे.ही कादंबरी साक्षी पावन ज्योतचे संपादक, लेखक सुभाष घोडके यांनी लिहिलेली आहे. साक्षीच्या जीवनावरील कथा त्यांनी सविस्तर या कादंबरीत अधोरेखित केलेले आहेत. साक्षी कादंबरी ही पिंपळगाव (डोळा) तालुका कळंब येथील घडलेल्या घटनेवर त्यांनी शब्दबद्ध केलेले आहे. साक्षी कादंबरीत गावातली परिस्थिती,गावातले कारभारी म्हणून गावातल्या अनेक व्यक्तींची नावे लेखकाने या कादंबरीत मांडायला विसरले नाहीत. खेडेगावातल्या शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे वर्णन,त्यांचं जगणं, राहणीमान त्यांनी या कादंबरीत मांडलेला आहे.गावातली औरंगाबाद,पुणे अशा ठिकाणी उद्योजक म्हणून झेंडा रोवलेले अनेक व्यक्ती त्यांनी नावासह या कादंबरीत लिहितात. तसेच गावातून अभियंता पदावर काम करणारे इंजिनिअर तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची ही नावे त्यांनी या कादंबरीत आवर्जून उल्लेख केलेला आहे.गावातल्या देवस्थानाचे वर्णन करताना सार्वजनिक कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक यात्रा,सप्ताह अशावेळी कशाप्रकारे एकत्र येतात व आनंदाने गुन्यागोविंदाने जगतात. हेही त्यांनी अगदी सहज आणि ग्रामीण भाषेत मांडलेला आहे. मोल मजुरी करून जगणारी कांचन आणि यशवंत यांच्या भोवती “साक्षी” ही कादंबरी फिरत राहते, त्यांचे स्वभाव वर्णन, हसत खेळत, गावकऱ्यासोबत वागणं अधोरेखित करतात. यशवंताची आई वडील लहान असतानाच नदीला मोठा पूर आल्यानंतर त्या पाण्यात वाहून जातात. हे हृदयाला पिळवटून टाकणारे प्रसंग या कादंबरीत वाचायला मिळतो.
यशवंत आणि कांचनच लग्न झाल्यानंतर दहा वर्षांनी कांचन ची कुस भरते.पण कांचनची डिलिव्हरी होताना कांचन चा मृत्यू होतो आणि कांचन सारखीच गोरी गोमटी देखणी साक्षी जन्माला येते.यावेळीचा प्रसंग लेखक सुभाष घोडके यांनी अगदी मनाला हेलावून टाकणारा प्रसंग आहे. कांचनचा मृत्यू झाल्यानंतर यशवंतावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्याचंही सखोल वर्णन त्यांनी या कादंबरीत केलेला दिसतं.या वेळी लोखंडे सिस्टर यशवंताला कशाप्रकारे धीर देते. हे ही आवर्जून लेखक सुभाष घोडके शब्दबद्ध करतात. साक्षी हळूहळू मोठी होऊ लागते आणि साक्षीचं शिक्षण कळंब सारख्या ठिकाणी विद्याभवन हायस्कूल मध्ये ती दहावीला चांगल्या मार्काने पास होते. यावेळी डॉ.अशोक मोहेकर सरांच्या हस्ते तिचा सत्कार होतो. आणि त्याची बातमी सा.साक्षी पावन ज्योत मध्ये पहिल्या पानावर छापणारे सुभाष घोडके हे आवर्जून या कादंबरीत मांडतात. तिला लग्नासाठी सुशिक्षित आणि गुणसंपन्न जयवंताशी जिवंत सारखा मुलगा मिळतो आणि त्याच्याशी तिचन लग्न होतं आणि पुन्हा यशवंताच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटतो. लग्न होऊन आठ दिवस झाल्यानंतर साक्षी ची आठवण येते आणि यावेळी बाप तिला भेटायला जाण्याचा विचार करतो. तेवढ्यात पत्रकार मिलिंद… यशवंताकडे येतो आणि मामा मामा म्हणून त्या यशवंताला एक वाईट बातमी देतो की, साक्षी आणि तिच्या पतीचा अक्सिडेंट झाला. तेव्हा मात्र यशवंताची दातखेड बसते त्याला काहीच बोलता येत नाही.ते दोघेही त्यांना भेटायला दवाखान्यात जातात. त्यावेळी जयवंताचं म्हणजे साक्षीच्या पतीचा मृत्यू होतो आणि पुन्हा साक्षी आणि जयवंत यांच्यावर महा संकट येते. काही दिवस असे निघून जातात. साक्षीने अनेक महापुरुषांची पुस्तकं वाचलेली असतात. त्यामुळे तिला सामाजिक कार्यात आवड निर्माण होते आणि सामाजिक संस्थेत तिला नोकरी लागते.
पिंपळगाव मध्येच एक मुलगा बेपत्ता होतो आणि त्याचा नर बळी कसा दिला याची हृदयाला वेदना देणारी सत्य घटना लेखक सुभाष घोडके या कादंबरीत लिहितात. एका भोंदू बाबाचे ऐकूण एका चिमुकल्या मुलाचा शेतात बळी दिला जातो आणि त्याची पोलीस चौकशी होते आणि त्या भोंदू बाबाला पकडलं जातं शिक्षा होते. त्या बाळाचा कसा नर बळी दिला. हे वर्णन सविस्तरपणे या कादंबरीमध्ये मांडतात. साक्षी सामाजिक कार्य करत असताना मिलिंद आणि साक्षी या दोघांचं एकमेकांवर प्रेम जुळलं जातं आणि गावकऱ्यांच्या विचाराने यशवंता त्या दोघांचं लग्न लावून देतो. नंतर आमिर खान व नाना पाटेकर यांच्या पाणी फाउंडेशन च्या वतीने पिंपळगाव येथे सर्व गावकऱ्यांच्या वतीने काम सुरू करतात आणि त्यावेळी तिला मदत करण्यासाठी मिलिंद ची सोबत होते आणि पूर्ण गावकऱ्यांच्या श्रमदानातून राज्य शासनाचा पुरस्कार या गावाला मिळतो आणि साक्षीला पाणी फाउंडेशन कडून पत्र येतं तिला नोकरीची ऑफर दिली जाते. तिला आर्थिक मदतीसाठी चेक दिला जातो. त्यावेळी पूर्ण गावासह साक्षी व मिलिंदला खूप आनंद होतो.या आनंदाच्या भरात यशवंतला तीव्र झटका येतो आणि तो मरण पावतो. पुन्हा साक्षीच्या आनंदावर पाणी पडतं.तिच्या पित्र विरहाने पुन्हा सारा गाव दुखात वुडाला जातो. अशी संघर्षमय घटना या साक्षी कादंबरीमध्ये लेखक सुभाष घोडके ग्रामीण भागातील साध्या सोप्या भाषेत मांडतात. हे ही कादंबरी सर्व वाचकांनी नक्की आवडेल अशी ही कादंबरी आहे.
कादंबरी- सत्य घटनेवर आधारित साक्षी लेखक- सुभाष घोडके प्रकाशक- प्रबुद्ध प्रकाशन कळंब मूल्य -२५ रुपये
पुस्तक परिचय- आश्रुबा कोठावळे संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब जि. धाराशिव
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन