कळंब (विशाल पवार ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी विद्याभवन हायस्कूल येथे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संचालक पवार व्ही.एस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात