August 9, 2025

एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

  • धाराशिव – येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी कौशल्य विकासावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
    सदर कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास विभाग मुंबई मंत्रालय येथील सहाय्यक आयुक्त संतोष राऊत हे लाभले होते. तर अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्यिक युवराज नळे उपस्थित होते.
    सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले. आभार डॉ. दत्तात्रय साखरे यांनी मानले.
    याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!