March 26, 2026

शिराढोण येथे नमो चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

  • शिराढोण (परमेश्वर खडबडे) – कळंब तालूक्यातील शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्यभिषेक निमीत्त राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठाण,श्री लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हासेगांव (शि) व भारतीय जनता युवा मोर्चा शिराढोण यांच्या संयूक्त विद्यमाने नमो चषक 2024 भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धा येथील दसरा मैदाणात अयोजीत करण्यात आल्या आहे. या नमो चषकाचा शुभारंभ दि.11 रोजी करण्यात आला. यावेळी लोकसभा प्रमुख नितीन काळे, विधानसभा निवडणुक प्रमुख नेताजी आबा पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, राजसिंह राजेनिंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे कळंब तालूका
    अध्यक्ष अजित पिंगळे, मिनाज शेख, कौश्यल्य विकास विभागाचे अतिरीक्त आयुक्त संतोष राउत, किरण पाटील, सुरेश महाजन, नितीन आबा पाटील, आदी
    मान्यवरांची उपस्थीती होती. या स्पर्धेचे प्रथम 31 हजार, व्दितीय 21 हजार व तृतीय 11 हजार हि पारीतोषीके भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा डाॅ.सौ.सरोजनी राउत यांच्या तर्फे दिले जानार आहेत. इतर पारीतोषीके हि प्रसन्न तोष्णीवाल, फेरोज पठाण (रांजणी), सचिन मुंदडा, महेश काळे, हश्मी एज्यूकेशन सोसायटी यांच्या तर्फे प्रत्येकी 3100 रुपये देण्यात येणार आहेत. या होणा-या सर्व क्रिकेट स्पर्धेचे व्यवस्थापन शंभुराजे क्रिकेट क्लब शिराढोण यांच्या कडूंन करण्यात येणार आहे.
error: Content is protected !!