August 8, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

  • धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी सामाजिक न्याय विभागचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी मगरे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, मराठवाडा प्रदेश कार्याध्यक्ष नितीन गायकवाड,मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांचा सत्कार सामाजिक न्याय विभाग जिल्हा धाराशिव यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष अतुल जगताप यांनी केला. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे हे दिवस-रात्र कष्ट करून पक्ष संघटना बळकट करण्याचे काम करीत असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबर पक्ष झालेला आहे असं जिल्हाध्यक्ष अतुल जगताप म्हणाले.
    दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचा “राज्यव्यापी संविधान गौरव महामेळावा” छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेला असून त्याकरिता पूर्व तयारी बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आली होती. तालुका अध्यक्षांकडून तालुका निहाय बैठकीचा आढावा घेण्यात आला. राज्यव्यापी संविधान गौरव महा मेळाव्यासाठी आपल्या तालुक्यातून कशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहेत याची तालुका निहाय माहिती घेण्यात आली. या राज्यव्यापी महामेळाव्यासाठी आपल्या शहर, तालुका व जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी,कार्यकर्ते,सहकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
    सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धाराशिव जिल्हा हा बालेकिल्ला असून या जिल्ह्याचे नेते सुरेश बिराजदार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत आपण ना.अजित पवाराकडे आग्रह धरावा असे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धाराशिव जिल्हा बालेकिल्ला असून सामाजिक न्याय विभागाचा विभागाच्या वतीने प्रचंड बहुमताने विजयी करू. चार महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेश बिराजदार यांना लोकसभेची उमेदवारी जिल्ह्यातून देऊ असे सांगितले होते. त्याच धर्तीवर प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांनी याचा पाठपुरावा करून ही उमेदवारी आपल्या पक्षाचे नेते सुरेश बिराजदार यांना मिळविण्याचा अजितदादा यांच्याकडे आग्रह धरू अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकारी यांना दिली.
    त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक न्याय पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आले.सामाजिक न्याय उमरगा तालुकाध्यक्षपदी राहुल ऋषिकेश बनसोडे, तुळजापूर शहराध्यक्षपदी राजरत्न कल्याणराव कदम,धाराशिव तालुका संघटक पदी अंगूल सुरेश माने, तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी भागवत नामदेव क्षीरसागर,कृष्णाथ रोहिदास लोंढे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप जाधव यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस महेश नलावडे,ज्येष्ठ नेते समियोद्दीन मशायक,अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष असदखान पठाण,सामाजिक न्याय धाराशिव शहराध्यक्ष विक्रम कांबळेसामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत शिंदे,मराठवाडा विभाग प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे,जिल्हा उपाध्यक्ष पंकज स्वामी, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी,सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष महमंद अबुबकर कोतवाल,सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,सामाजिक न्याय तुळजापूर तालुका अध्यक्ष विनोद जाधव, वाशी तालुकाध्यक्ष उद्धव क्षीरसागर,सा न्याय भूम तालुका कार्याध्यक्ष रोहन थोरात,सामाजिक न्याय धाराशिव महिला शहराध्यक्ष भाग्यश्री माळाळे, सा.न्याय परंडा शहराध्यक्ष भाग्यवंत शिंदे,विद्यार्थी तुळजापूर तालुकाध्यक्ष सोहेल बागवान,आदिवासी विभाग वाशी तालुकाध्यक्ष विशाल काळेआदिवासी धाराशिव तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर काळे,आदिवासी विभाग तुळजापूर तालुकाध्यक्ष जितेंद्र काळे,
    सामाजिक जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव,आंबे जवळगा जि.प गटप्रमुख लिंबराज लोखंडे,केशेगाव जि.प गटप्रमुख सुरेश राठोड,पाटोदा गणप्रमुख विकास गायकवाड, वनिता शिंदे,राणी आगळे, सुलोचना जाधव, लगाडे ताई,विनोद अवतारे आदी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!