कळंब (विशाल पवार यांजकडून ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ. अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१३-०२-२०२४ रोजी विद्याभवन हायस्कूल येथे विद्यार्थी स्वयंशासन दिन व निरोप समारंभ अतिशय उत्साहात पार पडला. या विद्यार्थी स्वयंशासन दिनासाठी मुख्याध्यापिका म्हणून प्राजक्ता काळे,उपमुख्याध्यापिका संस्कृती शेवाळे,उपमुख्याध्यापक अल्साबा रामपुरे,गटशिक्षणाधिकारी गायत्री मिटकरी,पवार सुरज, शिक्षणाधिकारी सार्थक तांबारे , लोंढे अनुष्का,पर्यवेक्षक गौंड सुखदा व पवार रोहित या विद्यार्थ्यांनी प्रशालेचे एक दिवस कामकाज पार पाडून स्वयंशासन दिन उत्साहात साजरा केला तर निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक तथा प्रशालेचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस, पर्यवेक्षक खामकर डी. टी हे होते. यावेळी नक्षत्रा डोके,रोहित तरटे , सार्थक तांबारे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना ज्येष्ठ सहशिक्षक विक्रम मयाचारी व राऊत आशा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी चोंदे या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन सागर व्ही.आर यांनी मानले.या वेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात