कळंब (अविनाश सावंत ) – कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष (2023- 24) मध्ये महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक(एन एन एम एम ) परिक्षेत सरस्वती विद्यालय गोविंदपुर तालुका कळंब येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून परीक्षेला बसलेले एकूण 16 विद्यार्थ्यापैकी 11 विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यात कुमारी समीक्षा बबन मुंडे ही 178 गुणापैकी 147 गुण घेऊन सर्वप्रथम आली आहे. शाळेच्या वतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांचा दि.9 फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक शेळके बी.एच. व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड ए.एस यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक लोंढे के. एम, सावंत बी.व्ही,मुंडे एच.बी,गायकवाड ए.एस, राऊत एस. एन, हिंगे ए.आर, यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामस्थां मधून अभिनंदन होत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात