गोविंदपूर (अविनाश सावंत ) – गोविंदपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथामिक शाळे मध्ये बाल आनंद मेळावा व आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे हा यामागील उद्देश होता. या आठवडे बाजारात विद्यार्थांनी सुमारे दहा हजार रुपयांची उलाढाल केली. विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फरसाण, किराणा सामान स्टेशनरी, कटलरी, हॉटेल,आदी वस्तूंची दुकाने थाटली होती. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कनकावाड एच.पी.,दिवटे डी.बी., देशमाने बी.जे.,माळी आर.बी.,ढोणे एस.एच.,श्रीम. मुंढे के. के.,श्रीम.पाटील जे.डी.,श्रीम.होवाळ वी.जी., श्रीम.नागटिळक ए.जी.,श्रीम.जमाले आर.आर.शालेय समिती आध्यक्ष रूंदावनी मुंडे, कबन मुंडे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन