धाराशिव – येणाऱ्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला मात्र या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी व आपल्या जिल्ह्यासाठी कुठलीही भरीव तरतूद नाही तसेच शेतकरी वर्ग जो आशा लावून बसला होता की हा या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे यामध्ये आपल्याला काहीतरी मिळेल त्यांची देखील मोदी सरकारने निराशा केली असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी काही चांगल्या योजना जाहीर केल्या असल्या तरी देखील शेतकरी वर्गाला काहीतरी या अर्थसंकल्पातून मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा फोल ठरली. तसेच इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे.तो स्लॅबदेखील सात लाखावर ठेवल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना देखील कराचा भुर्दंड बसणार आहे.त्यामुळे या अर्थसंकल्पातून शेतकरी,सर्वसामान्य व्यक्तींना दिलासा मिळालेला नाही.त्यांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालं आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी