कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणाची ज्योत पेटवु, बालविवाह समूळ मिटवू’ या विशेष सात दिवसांच्या वार्षिक शिबीराचे दि. २४/०१/२०२४ ते ३०/०१/२०२४ या कालावधीत जि.प.प्रा.शाळा मौजे लोहटा(पू) ता.कळंब जि. धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते.या शिबीराचे समारोप समारंभ बुधवार दि.३१ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाले.या शिबिरांची सुरूवात प्रमुख पाहुणे डॉ.बालाजी मैंद( रासेयो विभाग जिल्हा समन्वयक)यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै.नरसिंग(आण्णा) जाधव यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आले.प्रमुख मान्यवरांचे स्वागत प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. बालाजी मैंद यानी रासेयो समारोप कार्यक्रमानिमित्ताने रासेयो स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले आपण सर्वानी मिळून ग्राम विकासाला प्राधान्य दिले तर देश विकसित होईल.तसेच रासेयो च्या माध्यमातून राष्ट्र घडविण्याचे कार्य आपल्या श्रमातून होत असते.तसेच शिक्षणाचे महत्व व बालविवाहच्या चुकीच्या रूढी परंपरा मोडीत काढण्याचे आव्हान या माध्यमांतून ग्रामस्थाना केले.यावेळी प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य.शशिकांत जाधवर,मा.सोमनाथ सावंत(ग्रा.पं.सदस्य लोहटा प.) महादेव शिंदे(ग्रा.पं.सदस्य लोहटा प.)मा.कोठावळे सर, पवार मॅडम कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतिराम जाधव, प्रा.मनिषा कळसकर,प्रा. विनायक मिटकरी,प्रा. अमोल शिंगटे डॉ.महेश पवार,व रासेयो प्रतिनिधी कु.गायत्री चोंदे होते.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी केले.प्रास्ताविक प्रा.ज्योतीराम जाधव सुत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर यानी केले.व आभार डॉ.अनंत नरवडे यानी मानले.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थीनींनी व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले