कळंब – येथील ॲप्टेक कंप्यूटर एज्युकेशन या संगणक प्रशिक्षण केंद्रातील सारथी व एमकेसीएल मार्फत संगणक प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कळंब तालुक्यातील जवळा खुर्द,भाटशिरपुरा व हसेगाव या गावी ग्रामपंचायत समोरील प्रजासत्ताक दिनाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सारथीच्या विविध योजनांचे मार्गदर्शन चावडी वाचन मध्ये केले. यात त्यांनी युवक युवती,शेतकरी साठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली.एम.पी.एस.सी,यू.पी.एस.सी साठी सारथी मार्फत दिली जाणारी फेलोशीप,पीएचडी साठी सारथी मार्फत दिले जाणारी फेलोशीप तसेच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी अर्ज कोठे करायचा त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे तसेच अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणी कशा सोडवायच्या याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.तसेच सारथी मार्फत ॲप्टेक कंप्यूटर एज्युकेशन येथे मोफत प्रशिक्षण असणाऱ्या CSMS-DEEP या डिप्लोमा कोर्सचे प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले व हा कोर्स किती महत्त्वाचा आहे.हे उपस्थित विद्यार्थी व पालकांना पटवून दिले. त्याचबरोबर हा कोर्स मोफत असल्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. जवळा खुर्द येथे ॲप्टेक कंप्यूटर एज्युकेशनचे विद्यार्थी शुभम लोमटे,सौरव थोरात व प्रतीक घोगरे यांनी भाटशिरपुरा येथे पुनम गायकवाड व हरिओम भवर यांनी तर हासेगाव येथे सोनाली गायकवाड व वैष्णवी काळे यांनी चावडी वाचन केले. या विद्यार्थ्यांना एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक धनंजय जवळेकर व ॲप्टेक कंप्यूटर एज्युकेशनचे संचालक प्रा.संजय घुले यांचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात