August 9, 2025

शहरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राम भक्तात उत्साह

  •          *किर्तन शोभायात्रा आदी कार्यक्रम संपन्न
  • कळंब- दिनांक २२ जानेवारी आयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त कळंब शहरातील विविध मंदिरात पूजा,आरती अभिमित अक्षता कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. कसबा पेठ कळंब येथील श्रीराम मंदिर येथे ह.भ.प. बळीराम महाराज कवडे यांचे किर्तन महाआरती अभीमित अक्षता महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला तर विठ्ठल मंदिर येथे हरिदास पिंगळे यांनी राम कथा सांगितली तसेच १९९२ आयोध्या कार सेवेतील कार सेवकांचा सत्कार करण्यात आला. पुनर्वसन सावरगाव हनुमान मंदिर कळंब येथे श्रीरामाच्या प्रतिमेची सजावट करून मांडणी करण्यात आली होती.याप्रसंगी आयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे एल.ई.डी. टीव्ही पडद्यावर प्रक्षेपण व्यवस्था करण्यात आली होती.यामुळे अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना वेळेत या ठिकाणीही अभिमित अक्षता महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच बालाजी मंदिर येथे महिलांनी सुंदर कांड वाचन केले. या ठिकाणी राम लल्ला ,लक्ष्मण, भरत ,शत्रुघन यांची वेशभूषा बालकानी केली होती तर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य राम छायाचित्र असलेला ध्वज लावण्यात आला होता. या ठिकाणी युवकांनी प्रभू रामचंद्राची व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापना केली होती. श्रीराम मंदिर कसबा पेठ कळंब येथून दुपारी पाच वाजता भव्य शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक दक्षिणमुखी हनुमान मंदिर, भोई गल्ली, कथले चौक ,डॉ. बाबासाहेब आंबेडकरचौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आहिल्याबाई होळकर चौक ,स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा व पुढे देवी मंदिर, चोंदे गल्ली मार्गे श्रीराम मंदिर येथे पोहोचली या ठिकाणी महा आरती करण्यात आली.या शोभा यात्रेत श्री स्वामी समर्थ केंद्र येथील महिला रामभक्त तसेच महाराष्ट्र शासन किमान कौशल्य विभागाचे सचिव संतोष राऊत, मकरंद पाटील ,प्रकाश भडंगे, महादेव महाराज अडसूळ ,सुभाष हरदास, अनिल यादव, दत्ता लांडगे, संदीप बावीकर, महेश जोशी, सुनील देशमुख ,अशोक पोरे, राजेंद्र बिक्कड ,बाळासाहेब पत्की ,अनिल कुलकर्णी ,स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संजय होळे, शितल चोंदे ,शिवप्रसाद बियाणी ,पांडुरंग गुरव ,भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्यासह कळंब शहरातील महिला, पुरुष रामभक्तांचा मोठा सहभाग होता. महाआरती नंतर मिरवणुकीची सांगता झाली. मंदिरात संध्याकाळी दीपोत्सव करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राम प्राणप्रतिष्ठा समिती कळंबच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!