June 22, 2025

शिवसेनेच्या जनसेवा संपर्क कार्यालयाचे कळंब येथे धनंजय सावंत यांच्या हस्ते उद्घघाटन

  • कळंब – राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचे पुतणे व जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते दि.२२ जाने २०२३ रोजी श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्तावर कळंब शहरातील शिवसेनेच्या जनसेवा संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
     लोकसभा निवडणुकीच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.या वेळी कळंब येथील कार्यकर्त्यांनी धनंजय सावंत यांना आपण लोकसभा लढवावी असा आग्रह धरला. शिवसैनिक सोबत असून मतदारसंघाच्या उत्कर्षासाठी आपण खासदार व्हावे अशी गळ त्यांना घालण्यात आली.
    तसेच कळंब शहरात भावी खासदार धनंजय सावंत असे बॅनरही कार्यकर्त्याकडून लावण्यात आले.धनंजय सावंत यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी यासाठी सर्व शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली. या वेळी कळंब येथील कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे,माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे, प्रा.गौतम लटके, विलास पाटील,भारतीताई गायकवाड,अमरिन शेख,भुम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ हे पदाधिकारी उपस्थित होते व शहरातील माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,सागर मुंडे,सुधीर भंवर, मंदार मुळीक,शकील काजी, शंकर वाघमारे,महेश पुरी,बिटु पाटील,सिद्धू शिंगणापूरे, शकील काजी,बप्पा चोंदे,इम्रान सय्यद, कीरण लोखंडे, बाबुशेठ बागरेचा, अमर गायकवाड,व सर्व नेते,पदाधिकारी,नगरसेवक, माजी नगरसेवक शिवसैनिक उपस्थित होते.
    यावेळी मर्कज कमीटी कडून निवेदन देऊन धनंजय सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
    प्रास्ताविक संजय मुंदडा यांनी केले. प्रा.गौतम लटके यांनी मार्गदर्शन केले.
    या कार्यक्रमात माजीद मणीयार, मुसद्दीक मणीयार, विकास शिंदे, अकमल काझी यांना पक्षप्रवेश देण्यात आला.
error: Content is protected !!