कंडारी (शंकर घोगरे ) – मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे दि.२० जाने २०२४ रोजी पासून लाखो मराठ्यांची फौज घेऊन मुंबईकडे निघाले आहेत.त्यांच्या आवाहनानुसार कंडारी तालुका परंडा येथून दि.२२ रोजी दोन फोर व्हीलर गाड्यां भरून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.पहील्या टिम मधील २० बांधवांसह महिनाभर पुरेल एवढे अन्नसाठा सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.प्रथम ग्रामदैवत काळभैरवनाथाचे दर्शन घेऊन सरकारला मराठा आरक्षण देण्याची सुबुद्धी देऊ असे साकडे घातले.या वेळी गावातील माहीला पुरुष उपस्थीत होते. तर कंडारीतील दुसरी टीम दि.२५ रोजी मुंबईकडे जाणार असून लोक वर्गणी गोळा करून मुंबई वारीचा डिझेल पाण्याचा खर्च करण्यात येणार आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर