August 9, 2025

भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) –
    कळंब तालुक्यातील गोविंदपूर
    येथे भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
    दि.१९ शुक्रवार रोजी ह.भ.प. नामदेव रेंगे महाराज परभणी यांचे कीर्तन झाले. दि.२० शनिवार रोजी ह.भ.प.अण्णासाहेब बोधले महाराज डिकसळ, दि.२१ रविवार रोजी ह.भ.प.केशव भगत शास्त्री महाराज भगवानगड,दि.२२ सोमवार रोजी ह.भ.प.विनोदाचार्य मधुकर गिरी महाराज सोलापूरकर,दि.२३ मंगळवार रोजी ह.भ.प.कबीर अत्तार महाराज सातारा, दि.२४ बुधवार रोजी ह.भ.प.आदिनाथ लाड महाराज आळंदी,दि.२५ गुरुवार रोजी ह.भ.प.संतोष वनवे महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे.
    तर दि.२६ शुक्रवार रोजी सकाळी ८ ते १०ग्रंथराज ज्ञानेश्वरी व भगवान बाबा प्रतिमेची भव्य दिव्य नगर प्रदक्षिणा होईल. व ११ वाजता ह.भ.प.केशव महाराज घुले शास्त्री यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. तरी गोविंदपूर व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!