कवी – पंडित कांबळे
- धाराशिव – चंद्रपूर येथील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार २०२२ हा पंडित कांबळे यांच्या “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात” या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कथा,कविता,कादंबरी,समीक्षा आणि आत्मकथन या साहित्य प्रकारासाठी २०२२ साली प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके मागण्यात आली होती. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून जवळपास ३०२ साहित्यकृती प्राप्त झाल्या होत्या. कवितासंग्रहासाठी पंडित कांबळे यांच्या “पेटलेल्या शहराच्या कल्लोळात” या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. एका विशेष कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनंता सूर यांनी कळविले आहे.
पंडित कांबळे हे धाराशिव येथील नगर परिषद शाळा क्रमांक १४ येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करतात.त्यांचे कविता,बालकविता,संपादने, समीक्षा अशी विविध विषयावरील व विविध प्रकारातील ११ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या अनेक कवितांचा हिंदी अनुवाद प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या कवितासंग्रहाला राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व साहित्यिक,मित्र,नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला