धाराशिव – कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते,संपादक लेखक सुभाष घोडके यांचे नुकतेच ६१ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी लिहिलेल्या सत्य घटनेवर आधारित साक्षी या कांदबरीचे प्रकाशन व इतर कार्यक्रम घेण्यात आले.ते धाराशिव येथे आले असता राजगीर वधु वर सूचक केंद्र व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या,फुले शाहु आंबेडकर विचारधारा पसरविण्याचे काम सातत्याने सुभाष घोडके करीत असुन त्यांचे संविधानाचा जागर एकांकिका सह इतरही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साप्ताहिक साक्षी पावनज्योतचे ते संपादक आहेत.त्यांचे स्वलिखीत सत्य घटनेवर आधारित साक्षी या कांदबरी प्रतीचे वितरण केले.यात प्रामुख्याने लेखक सुभाष घोडके,बापु कुचेकर,बाबासाहेब बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे सह इतर अन्य उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला