धाराशिव (जिमाका) – शेतक-यांनी आयोजित या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कवायत मैदान येथे १८ ते २२ जानेवारी या कालावधीत महारष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग,कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे उदघाटन पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले.यावेळी ते बोलत होते.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,बिजमाता म्हणून प्रसिध्द असलेल्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपिरे यांची विशेष अतिथी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, लातूर विभागाचे कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीष हरिदास,प्रगतशील शेतकरी त्र्यंबक फड व स्वातंत्र्य सेनानी बुबासाहेब जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावी,शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी अशाप्रकारच्या महोत्सवांचे आयोजन अत्यंत लाभदायक असते.असे कृषी महोत्सव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले.आपला धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा आहे.आपणास दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टीला सामोरे जावे लागते.निसर्गच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.राज्य शासन शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटरग्रिडसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.धाराशिव जिल्ह्यास उजनी धरणातून ७ टिएमसी पाणी मिळावे म्हणून ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. शेतक-यांना मदत करण्याच्या भावनेतून मराठवाडा वॉटर ग्रिड योजना राबविली जात आहे.धाराशिव जिल्ह्यासहित संपूर्ण मराठवाड्याचा विकास व्हावा या हेतूने उजनी प्रकल्पातून सात टीएमसी पाणी भूम, परंडा,वाशी,कळंब,लोहारा,उमरगा, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील आष्टी या तालुक्यांना मराठवाडा वॉटर ग्रिडमुळे पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की,मी स्वत: शेतकरी आहे.मला शेती आणि शेतक-यांच्या व्यथा माहित आहे. आपला देश शेतीप्रधान आहे.देशाचे अर्थकारणही शेतीवर अवलंबुन आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यास शेतकरी सक्षम आहेत.त्यासाठी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये उच्च तंत्र व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणेही आवशयक आहे.हे कृषी प्रदर्शन शेतक-यांसाठी अत्यंत उपयुक्त असून याचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बिजमाता राहीबाई पोपिरे म्हणाल्या,रासायनिक शेती व धान्य मानवी जीवनामध्ये आल्यापासून अनेक व्याधींनी माणसाला ग्रासले आहे.हे टाळण्यासाठी शेतक-यांनी जुने ते सोने याप्रमाणे आपल्याकडील बियाण्यांचा वापर करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा.नैसर्गिक शेतीवर हवामानानुसार पिकावर कोणताही विपरित परिणाम होत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हा अधिक्ष्क कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले. यावेळी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे आणि कृषी सहसंचालक दिवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार उपविभागीय कृषी अधिकारी यांनी मानले.या कृषी महोत्सवात कृषी विभागासोबतच विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहे.जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेतकरी,विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, बचतगट महिला या उद्घाटन कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला