कळंब ( माधवसिंग राजपूत )- मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या भूमिपुत्रांच्या जाज्वल संग्रामाचा धागघगता इतिहास सांगणारे हे नाटक असून सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक, कार्य संचालनालय यांच्यावतीने व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उस्मानाबाद यांच्या सहकार्याने नाटकाचे प्रयोग सादरीकरण होत आहेत. गाथा मुक्ती संग्रामाची हे दोन अंकी नाटकाचे लेखक व दिग्दर्शक सतीश साळुंखे व शैलेश गोजमगुंडे हे असून नाटकाचा प्रयोग कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या प्रांगणातील रंगमंचावर दिनांक 26 सप्टेंबर रोजी झाला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा इतिहास व झालेल्या लढ्यातील प्रसंग या नाटकात मांडण्यात आले असून हे नाटक काशिनाथ चिंचाळकर व त्यांचे मित्र स्वातंत्र्यसैनिक नरहरी काशीद यांना समर्पित आहे या नाटकाचे प्रयोग मराठवाड्यातील 76 तालुक्यात होत आहेत. नाटकाचे उद्घाटन शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पवार ,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा. संजय कांबळे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले या प्रसंगी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती कळंबचे सदस्य यांची उपस्थिती होती नाटकाचे समन्वयक विशाल शिंगाडे यांनी सर्वांचे स्वागत केले. नाटकात हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांनी हिप्परगा,अंबाजोगाई येथे सुरू केलेल्या राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी सुरू केलेल्या शाळा व पुढे त्यांचा ह्या लढ्यातील सहभाग ते स्वतः कथन करीत आहे या प्रसंगापासून नाटकाची सुरुवात होते.आर्य समाजाची चळवळ बन्सीलाल आर्य यांच्या सभेची प्रतिक्षा करणारा वेद प्रकाश यांनी केलेला संघर्ष व त्याचे बलिदान तसेच झाशीची रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांच्याप्रमाणे लढलेल्या दगडाबाई शेळके हे नाटकातील प्रसंग बघत असताना प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येते हैदराबाद स्टेटचा राजा निजाम उस्मानआली व रझाकार संघटनेचा मोहरक्या काशीम रझवी यांच्यातील संवाद व मराठवाड्यातील जनता स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी उत्सुक आहे. जनतेकडून होणारा हा उठाव दडपून टाकण्यासाठी केलेल्या अन्यायाचे प्रसंग कलाकारांनी आपल्या अभिनय ताकदीने मांडले आहेत निजाम व काशीम रझवी यांच्यातील संवाद त्यांच्या मनाची झालेली घालमेल हा अभिनय देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे ,शेषराव वाघमारे यांच्या बैठका ,जंगल सत्याग्रह मांडण्यात आले आहेत प्रसंगाची सुरुवात पोवाड्यातून शौर्यगाथा गायनाने होते यामुळे प्रसंगासी प्रेक्षक एकरूप होता, नाटकात ओंकार वट्टे, गणेश रोडगे, सोमनाथ भंडारे, अक्षता किरसे, समीर विरुडकर ,अविनाश चंदनकर ,महेश चौखट ,संतोष यादव ,विशाल रणदिवे, सचिन शिंदे, आतिश पालके ,अबोली पालखे यांच्या भूमिका असून प्रकाशयोजना आणि संगीत संयोजन अशोक घोलप यांचे आहे नाटक प्रयोगानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम समितीच्या वतीने समन्वयक विशाल शिंगाडे व कलाकारांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या अभिनयाचे कौतुक करत अभिनंदन केले उपस्थित विद्यार्थ्यांनी वंदे मातरम च्या घोषणांनी परिसरात दुमदुमुन गेला. याप्रसंगी प्रकाश भडंगे, महादेव महाराज अडसूळ, प्रा.डॉ.हेमंत भगवान, प्राचार्य महादेव गपाट, माधवसिंग राजपूत ,बंडू ताटे, संताजी वीर ,निलेश पांचाळ ,सचिन डोरले, गुलचंद कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात