February 9, 2026

नव्या वाटा नव्या दिशा समाज बदलतो आहे. आपणही पाऊलवाट चालायला सुरू करावी..!

  • मित्रांनो,
  • आपल्या घरातल्या नातेवाईकांचं वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर आपण सर्व मिळून त्यांची रक्षा पाण्यात विसर्जित करून टाकतो. आणि समुळ अस्तित्वच जणू नष्ट करतो. एका बाजूला नाती सांभाळली पाहिजे असं म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीचं काहीही शिल्लक ठेवत नाहीत.कपडे साधने सर्वकाही जाळून टाकतो. राख पाण्यात मिसळून टाकतो. ही रीत हा रिवाज खऱ्या अर्थाने प्रेमाचा नाही. असेच मला वाटते.नाती जिवंत असेपर्यंत आई ,बाबा, आज्जी, आजोबा म्हणायचं आणि मृत्यूनंतर त्याचे नावही नामशेष करायचं. हे योग्य नाही. म्हणून बदलत्या काळानुसार शिकलेले सुवरलेले बहुजनांमधील शिवपुत्र आता नव्याने विचार करत आहेत. अशातच मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष सतीश पवार साहेब यांनी या विचाराचे समर्थन केले.
  • मागील आठवड्यात त्यांच्या आजींचे *स्व . हिरकणाबाई भिमराव पवार* वय वर्षे105 यांचे वृद्धापकाळाने देहावसन झाले. त्यांनी आजींची रक्षा पाण्यात विसर्जित न करता त्या रक्षेवरती फळांची झाडे लावली. यांनाच खरं तर भूमिपुत्र म्हणायला हवं. सतीश पवार यांच्या भावना विचारल्या असता त्यांनी सांगितले की आजीच्या रूपाने ही झाडे सावली देतील. ऑक्सिजन देतील. फळे देतील. आणि आज्जीच्या स्मृती रोज जागृत राहतील. खरंतर हा विचार मानवतावादी आहे. निसर्ग रक्षणाचा विचार आहे. अशा थोर माणसांच्या विचारातून भविष्यातला समाज घडावा त्यांच्या पाऊलवाटेवरती आपणही वाट करायला हवी….
  •             – भूमीपुत्र वाघ
error: Content is protected !!