कळंब – शहरातील रणसम्राट क्रीडा मंडळ संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी जाफर पठाण व पर्यवेक्षक पदी काकासाहेब मुंडे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणसम्राट क्रीडा मंडळाचे सहसचिव भागवत सुरवसे होते. यावेळी विद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.मीनाक्षी शिंदे-भवर यांच्या हस्ते प्रतिभा गांगर्डे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना Glantorax या आंतरराष्ट्रीय संस्थेने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील शंकर गोंदकर यांनी अविरतची व्यवसाय मार्गदर्शन व शालेय समुपदेशन ही पदविका प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन जीवनसिंह ठाकूर यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर