धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.31 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 319 कारवाया करुन 99,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल रविवार दि.31.12.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 10 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 121 लि. गावठी दारु, देशी विदेशी दारुच्या 280सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन यांची एकत्रीत किंमत अंदाजे 24,010 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 10 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-शिवाजी प्रभाकर जाधव, वय 40 वर्षे, रा. उमरगा चि. ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.15 वा. सु. उमरगा चि. येथे अंदाजे 1,600 किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
2)आंबी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-शिवराज मन्सु मोहिते, रा. वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव हे 14.00 वा. सु.वाटेफळ बसस्थानक चे पाठीमागे अंदाजे 910 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
3)शिराढोण पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-सचिन हरिभाउ पवार, वय 49 वर्षे, रा. करंजकल्ला ता. कळंब जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. लोहटा पुर्व गावाचे जवळ आकाश हॉटेलजवळ अंदाजे 2,650 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 25 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
4)ढोकी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-वैशाली विजय काळे, वय 20 वर्षे, रा. पळसप पारधी पीडी ता. जि. धाराशिव हे 18.15 वा. सु. भिमनगर समोर पळसप येथे अंदाजे 5,200 किंमतीची 65 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
5)मुरुम पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-जगदिश गुलाब पवार, वय 38 वर्षे, रा. शास्त्रीनगर तांडा दाळींब जि. धाराशिव हे 20.20 वा. सु. शास्त्रीनगर तांडा दाळींब येथे अंदाजे 2,765 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 79 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
6)वाशी पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-विजय रामलिंग जगताप, वय 36 वर्षे, रा. वाशी, ता. वाशी जि. धाराशिव हे 20.30 वा. सु. हॉटेल मातोश्रीचे लगत अंदाजे 490 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 07 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
7)लोहारा पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-तुळशीराम बाबुराव बनसोडे, वय 65 वर्षे, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. ऐश्वर्या बारचे बाजूला पत्रयाचे शेडसमोर अंदाजे 2,080 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 26 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
8)तुळजापूर पो. ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-पांडुरंग भागवत गादे, वय 32 वर्षे, रा. आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 19.45 वा. सु. भवानी किराणा दुकानाच्या बाजूस असलेल्या बोळात अंदाजे 1,550 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
9)धाराशिव ग्रामीण पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-1) अंजली दत्तात्रय पवार, रा.भवानी चौक येडशी ता. जि. धाराशिव या 20.45 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,880 किंमतीची 36 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर 2) आरोपी नामे-संभाजी शहाजी पवार, रा. भवानी चौक येडशी ता. जि. धाराशिव हे 19.45 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 3,885 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 111 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)सचिन अर्जुन बानगुडे, वय 36 वर्षे, रा. वाकडी ता. परंडा जि.धाराशिव, 2)दिपक रामेश्वर चंदनशिवे, वय 36 वर्षे, रा. भोपळा ता. केज जि. बीड, हे दोघे दि.31.12.2023 रोजी 15.30 ते 16.45 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे पिकअप क्र एमएच 25 एजे 2436 वछोटा हत्ती क्र एमएच 04 एफपी 1031 हे बसस्थानक कळंब व होळकर चौक कळंब येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने ज्वलनशील पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) दत्ता भिमराव कुचेकर, वय 29 वर्षे, रा. इंदीरानगर ता. कळंब जि. धाराशिव, 2) निसार बशीर शेख, वय 30 वर्षे, रा. पु. सावरगाव त. कळंब हे देाघे दि.31.10.2023 रोजी 15.25 ते 15.52 वा. सु. तुकाराम चौक कळंब व गोल्डन वडापाव सेंटर येथे आपआपल्या हात गाडीवर येणारे जाणारे लोकांचे मानवी जिवन धोक्यात येईल अगर दुखापत अथवा नुकसान जिवीत किंवा वित्त हानी होवू शकते याची जाणीव असताना ही निष्काळजीपना करुन आपल्या हातगाडीवर गॅस शेगडी पेटवून चहा व वडापाव तयार करताना मिळून आले. तसेच त्यांनी भा.दं.वि.सं. कलम-285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- रितेश सतिश गायकवाड, वय 19 वर्षे, रा. सावित्रीबाई फुले सोसायटी धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.31.12.2023 रोजी 20.30 वा सुमारास नविन शासकिय ग्रंथालय धाराशिव येथे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना आनंदनगर पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) बाळु हरिभाउ जाधव, वय 31 वर्षे, रा. साईनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.30.12.2023 रोजी 20.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 डी 7352 ही आरोग्य कार्नर येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. तर 2) तिरुपती मच्छिंद्र मुरमे, वय 38 वर्षे, रा. जुनी पेठ, ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.31.12.2023 रोजी 16.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 13 ए डब्ल्यु 3259 ही हैद्राबाद रोडवर डिवायडरच्या दक्षिण बाजूस उमरगा येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) प्रमोद शंकर केळे, वय 27 वर्षे, रा. केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.30.12.2023 रोजी 19.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 14 बीई 0629 ही सरमकुंडी फाटा ते मुख्य चौकात मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले.तर 2) सुरज प्रदीप सुकटे, वय 29 वर्षे, रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.31.12.2023 रोजी 20.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 14 एफवाय 6302 ही पारा चौक वाशी येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) महेश राजेंद्र कोळगे, वय 30 वर्षे, रा. उमरेगव्हाण ता. जि. धाराशिव, हे दि.31.12.2023 रोजी 21.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एएम 3084 ही उमरेगव्हाण चौकात मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ खुन.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-शब्बीर दस्तगीर पिंजारी रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्यांची चुलती मयत नामे- जैनाबी कासीम पिंजारी रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना घराची चावी मागीतली असता जैनाबी यांनी चावी खाली का टाकुन दिली या कारणावरून नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून दि. 30.12.2023 रोजी 17.30 वा. सु. ओढत नेहुन पाण्याने भरलेल्या दशरथ घुगे यांचे अणदुर शिवारातील जमीन गट नं 06/02 मधील विहीरीत ढकलुन देवून जिवे ठार मारले आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मस्तान ईसाक शेख, वय 36 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 302, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
लोहारा पोलीस ठाणे : दि.27.12.2023 रोजी 17.00 वा. सु. ते दि. 28.12.2023 रोजी 09.00 वा. सु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेगाव उत्तर येथील वर्ग खोल्यांचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन वर्गातील तिन 52 इंची एलईडी टिव्ही,दोन 32 इंची एलईडी टिव्ही, एच पी कंपनीचे प्रिंटर, तिन मोबाईल टॅब असा एकुण 68,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विश्वनाथ दशरथ लादे, वय 52 वर्षे, व्यवसाय- मुख्याध्यापक जि.प. आ. शाळा सालेगाव उत्तर रा. सालेगाव उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 457,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-रेवणसिध्द महादेव कलशेट्टी, वय 38 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे जळकोट शिवारातील शेत गट नं 118 येथे शेडमधील दोन बोकड व एक शेळी अंदाजे 16,000 ₹ किंमतीचे हे दि. 30.12.2023 रोजी 19.00 ते 23.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेवणसिध्द कलशेट्टी यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 461,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-बबन भगवान काळे, वय 80 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांचे बावी शिवारातील शेत गट नं 17 मधील 25 गुंठ्यातील तुरीचे पिक अंदाजे 32,000₹ किंमतीचे हे दि. 22.12.2023 रोजी 12.00 ते 01.00 वा. सु. आरोपी नामे- प्रल्हाद वसंत कांबळे, 2) रामा रंगनाथ कांबळे, 3) केराबाई रामा कांबळे, 4) रोहीणी प्रल्हाद कांबळे 5) अर्चना सचिन कांबळे सर्व रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांनी चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बबन काळे यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रज्ञा संपत खबाले, वय 31 वर्षे, रा. भाट निमगाव ता. इंदरपूर जि. पुणे या दि. 25.12.2023 रोजी 15.30 वा. सु. भुम बसस्थानक येथे उभा असताना त्यांचे 22.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे 1,24,200 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रज्ञा खबाले यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-शिवप्रसाद उर्फ सागर सुभाष भडंगे, वय 46 वर्षे, व्यावसाय- मेडीकल दुकान रा. कल्पनानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचा अंदाजे 20,000₹ किंमतीचा वन प्लस कंपनीचा 7 प्रो मोबाईल हा दि. 30.12.2023 रोजी 15.30 वा. सु. भडंगे मेडीकल चे काउंटरवरुन शिवाजी चौककळंब येळुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवप्रसाद भडंगे यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
तामलवाडी पोलीस ठाणे : मयत नामे-दशरथ होनप्पा जोगन, वय 45 वर्षे, रा. हडगली ता. आळंद जि. कलबुर्गी हे दि.28.12.2023 रोजी 03.00 ते 03.15 वा. सु. सरस्वती मंगल कार्यालय तामलवाडी समोरुन येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून दशरथ जोगन यांना धडक दिली. या आपघातात दशरथ जोगन हे गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालक हा आपघाताची माहिती न देता आपघात स्थळावरुन वाहनासह पासार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी नामे- चनाम्मा दशरथ जोगन, वय 40 वर्षे, रा. हडलगी ता. आळंद जि. कलबुर्गी ह.मु. वडोली उंब्रज ता. कराड जि. सातारा यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी