August 9, 2025

विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणे आवश्यक – प्रा.डॉ.विश्वाधार देशमुख

  • कळंब ( अरविंद शिंदे यांजकडून ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृती  व्याख्यानमाला मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने  व्याख्यानमाला प्रतिवर्षी २५ ते २७ डिसेंबर आयोजित केली जाते, यंदाचे हे १२ वर्ष असून एकूण ३६ व्याख्यात्यानी तर महिला व्याख्यात्यानी (कोरोना काळात आभासी ) व्याख्यान दिले आहे.
    सन २०२३-२४ या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.डॉ. संजय चौधरी (करमाळा) यांनी, तर भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे – याकरीता विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणे आवश्यक या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना प्रसिद्ध व्याख्याते डॉ. विश्वाधार देशमुख ( यशवंत महाविद्यालय, नांदेड) यांनी मत व्यक्त केले.
            व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.अशोकराव मोहेकर,  रोटरीचे अध्यक्ष सुदर्शन नारकर, सचिव डॉ. साजेद चाऊस, प्रो.चेअरमन श्री अरविंद शिंदे उपस्थित होते. पुढे ते म्हणाले,” प्राचीन भारतीय इतिहास पाहताना आपल्याला अनेक शूरवीर महापुरुषांनी जीवन कसे जगावे, याविषयी मौलिक तत्त्वज्ञान सांगितले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून – “भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे” पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी सुख समाधानाची मागणी केलेली आहे. भगवान वर्धमान महावीर, गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून एकमेकांना साह्य करून निसर्गात पशुंपेक्षा श्रेष्ठ असल्याची जाणीव निर्माण करून दिली आहे. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा माणूस बनण्याची विचारांची गरज असल्याचे डॉ.विश्वास देशमुख यांनी प्रतिपादन केले आहे .”
    या व्याख्यानमालेचे आभार प्रा.संजय घुले यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी करुन राष्ट्रगीताने सांगता झाली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी मंडळी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हनुमंत जाधव, प्रकाश गायकवाड, संदीप सूर्यवंशी, संतोष मोरे आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.यावेळी डॉ. रामकृष्ण लोंढे,डॉ.सत्यप्रेम वारे,श्रीकांत कळंबकर, श्याम जाधवर, सुशील तिर्थकर,व्ही.के गायकवाड हे उपस्थित होते.
error: Content is protected !!