August 9, 2025

महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तीन प्रशिक्षणार्थींची निवड

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती संभाजी राजे नगरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील “कोपा” या ट्रेडचे राणी काळे,अभिषेक कळेकर,उत्कर्ष गरड या तीन प्रशिक्षणार्थींची निवड ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी धाराशिव सर्कलमध्ये अप्रेंटीशीपमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून झाली आहे.
    यानिमित्ताने या यशस्वी प्रशिक्षणार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे निदेशक सागर पालके यांचे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे व वेद शैक्षणिक संकुलातील प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक विनोद जाधव,विनोद कसबे यांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!